नागपूर : चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरुवारी नागपुरात दाखल झाला आहे. सचिन पत्नी अंजलीसह विमानतळावर उतरल्यानंतर थेट ताडोबाला रवाना झाला.
सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त जंगल सफारीचेही वेड आहे. काही दिवसांपूर्वीच सचिनने उमरेड करंदला अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला होता. आता पुन्हा तो पत्नी अंजली तेंडुलकरांसोबत जंगल सफारीसाठी नागपुरात पोहोचला आहे. त्याच्यासोबत त्याचे काही जवळचे मित्रही होते. विमानतळाहून ते ताडोबासाठी रवाना झाले.
सचिन नागपुरात येणार असल्याची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांनी विमातळावर मोठी गर्दी केली होती.