नागपूर : सदर पोलिसांच्या हद्दीत प्रॉपर्टीच्या वादातून पुतण्याने काकूवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पीडित कल्पना वाघ यांच्या तक्ररीवरून पोलिसांनी आरोपी सुमित वाघ आणि त्याचा साथीदार मुकुल खडसे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित वाघ हा कुख्यात गुन्हेगार असून मुकुल खडसे त्याचा जवळचा सहकारी आहे. सदर पोलिस स्टेशन अंतर्गत सुमित आणि कल्पना यांच्यात वडिलोपार्जित घरावरून वाद पेटला होता.
हा वाद इतका विकोपाला गेला की सुमितने त्याची काकू असलेल्या कल्पना वाघ यांच्यावर चाकूने हल्ला करून पळ काढला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कल्पना यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कल्पना यांच्या जबाबाच्या आधारे सदर पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर भादंवि कलम ३०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.