Advertisement
नागपूर : पाचपावली पोलिसांनी ड्रग्सच्या तस्करीत कुख्यात आरोपीला त्याच्या साथीदारासह बेड्या ठोकल्या आहेत. रोशन राज मेश्राम (वय 21 वर्ष रा. बापू कुटी नगर ), विशाल विजय मेश्राम (वय 25 वर्ष रा. बापू कुटी नगर , पाचपावली) असे आरोपींचे नाव आहे. या दोघांकडून 36 हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ड्रग्स तस्करांची माहिती मिळाली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 36 हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅम साठ मिलिग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण 53, 240 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर आरोपींविरोधात कलम 8 क, 22 ब,29 एनडीपीएस अॅक्ट 1985 अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे.