Published On : Fri, May 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात, निर्णयाकडे जनतेचे लक्ष !

नागपूर : उषा सेवकदास कांबळे (वय ५४) आणि दीड वर्षीय राशी रविकांत कांबळे या दोघींची १७ फेब्रुवारीला गळा कापून हत्या करण्यात आली होती. दोघींचेही मृतदेह पोत्यात कोंबून आरोपींनी विहीरगावजवळच्या नाल्यात फेकले होते. या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडाचा खटला अंतिम टप्प्यात असून निर्णयाकडे जनतेचे लक्ष लागले आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे डीजे 10 एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकारतर्फे व आरोपी तर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणात फिर्यादी रवीकांत कांबळे यांची आई व दीड वर्षाच्या मुलीची 17 फरवरी 2018 रोजी निर्घृण पणे हत्या करण्यात आली होती. युक्तीवादा दरम्यान विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांनी असे सांगितले की आरोपी विरुद्ध सरकार पक्षाने पुरावा कायद्याचे अनुषंगाने सबळ पुरावे कोर्टा समोर सिद्ध केले आहे .

या प्रकरणात सरकारतर्फे एकूण 35 साक्षीदार पडताळण्यात आले आहे. युक्तीवादाचे मुख्य मुद्दे उज्वल निकम यांनी मांडले त्यात आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चार चाकी महेंद्र एक्सयूव्ही 500 गाडीतून उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांचे रक्ताचे डाग मिळून आले तसेच घरातून व गाडीतून मिळून आलेले रक्ताच्या डागाच्या नमुनाच्या अहवाल फॉरेन्सिक चाचणी मध्ये उषाबाई कांबळे यांचा डीएनए सोबत जुळून आल्याचे निष्पन्न झाले असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

Gold Rate
Monday 02 March 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इतर अनेक मुद्द्यावरून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याद्वारे युक्तिवाद करण्यात आला जसे की प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी आरोपी गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू यांना घटनेच्या दिवशी दुकानात पाहिले तसेच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना दोन पोते आरोपीच्या घरच्या जिन्यावरून खाली उतरवून गाडीत टाकताना आणि त्यानंतर ते पोते विहिरगाव नाल्यात फेकताना पहिले आहे. आरोपींनी खून करून पुरावा सुद्धा नष्ट केलेला आहे असा युक्तिवाद करण्यात आला , तसेच मृतक उषाबाई कांबळे यांच्या अंगावरील दागिने हे आरोपी अंकितने अटक झाल्यानंतर लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून काढून दिले होते हे सुद्धा साक्षीदारांच्या पुराव्यात कोर्टा समोर सिद्ध झालेले आहे. आरोपींकडून मृतक उषाबाई कांबळे यांचा मोबाईल व आरोपीने वापरलेले शस्त्र आरोपी गणेशने फेकलेल्या ठिकाणावरून काढून दिले हे कोर्टा समोर साक्षीदारा मार्फत सिद्ध झाले आहे, असेही युक्तीवादात नमूद आहे.

तसेच सरकार पक्षाने डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या पुराव्याच्या आधारे जप्त शस्त्राद्वारे मृतांच्या शरीरावर जखमा होणे शक्य आहे हे देखील कोर्टा समोर सिद्ध केले आहे.
युक्तिवादाच्या अंतिम टप्प्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माननीय कोर्टाला असे सांगितले की सर्व आरोपींनी सूडबुद्धीने ,गुन्हेगारी कट रचून ,संगमतपने दिढ वर्षाच्या चिमुकली मुलीचा व तिच्या आजीचा गळा कापून निर्घृणपने खून करून त्यांचे प्रेत पोत्यात टाकून गाडीच्या माध्यमाने नाल्यात फेकले व पुरावा नष्ट केला.

आरोपी अंकित शाहू, गुडिया शाहू व विधी संघर्ष बालक तर्फे आरोपींची वकील आर.एम. भागवत यांनी संगितले की सरकार पक्षाने न्यायालयात आरोपीच्या विरोधात जी बाजू मांडली ती पूर्णपणे खोटी आहे ,सरकार पक्षाने न्यायालयासमोर जे पुरावे सादर करण्यात आले आहे ते सुद्धा खोटे आहे, हा खुन आरोपींनी केलाच नाही असा त्यांनी युक्तिवाद भागवत यांनी न्यायालयात केला आहे. तसेच आरोपी गणेश शाहु तर्फे एडवोकेट चांदेकर यांनी आरोपीला वाचविण्यासाठी न्यायालयाला हे सांगितले की सरकारतर्फे आरोपींच्या विरोधात जे पुरावे सादर केले ते सर्व खोटे आहेत , सरकमटन्सेस एव्हिडन्स ची चैन ही पूर्ण पने जुळून येत नाही ती चैन ब्रेक होत आहे असा युक्तिवाद त्यांनी केला.

त्यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी १० मे रोजी न्यायालयात काउंटर रिप्लाय दिला व लिखित सबमिशन सुद्धा दिले, न्यायालयाला असे सांगितले की कांबळे दुहेरी हत्याकांड केसमध्ये आरोपींचा कसा समावेश आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसेच रासायनिक पुरावा म्हणजे डीएनए आरोपींच्या घरात तसेच आरोपींच्या गाडीत कसा आला याचे उत्तर साक्षपुराव्यात आरोपींनी कुठल्याही प्रकारे दिले नाही .

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाचा युक्तिवाद सरकारतर्फे तसेच आरोपींच्या वतीने संपला आहे हा युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश डीजे 10 एस. बी. गावंडे यांच्या कोर्टात झाला लवकरच कांबळे दुहेरी हत्याकांडाचा खटलेचा निर्णय येणार आहे, खटल्याच्या निर्णयावर जनतेचे लक्ष लागलेले आहे. सदर खटल्यात सरकार तर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम फिर्यादी रविकांत कांबले , अ‌ॅड समीर सोनवणे तसेच आरोपी तर्फे आर.एम. भागवत, अ‌ॅड. अनिरुद्ध चांदेकर यांनी बाजू मांडली तसेच या खटल्यात लेखनिक म्हणून नायक पोलीस कोन्स्टेबल हर्शदिप खोब्रागडे यांनी काम बघितले.

Advertisement