Advertisement
नागपूर: शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या ४६ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेफ आणि त्याचा मित्र स्कूटरवरून जात असताना त्यांच्या वाहनाला भरधाव कारने धडक दिली. या अपघातानंतर कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हा अपघात राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात झाला असून मृताचे नाव मुन्ना खेमचंद चौहान असे असून तो राज नगर येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी सांगितले की, ४६ वर्षीय तरुण परसोडी येथील हॉटेल शेरे पंजाबमध्ये शेफ म्हणून काम करत होता.