Advertisement
मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापेमारी सुरु केली आहे. इतके नाही तर सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला.
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर सीबीआयने धाड टाकली आहे.