नागपूर: महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यात भर घालत आज दिनांक १६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत २०० रुपयांचे टॉप अप करत महा कार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळ्याने देण्याची गरज नाही. सोबत २०० रुपयांचे टॉप अप प्रवास दरम्यान तिकीट खरेदी करता देखील वापरता येते. महा कार्ड खरेदी करतांना १५० रुपये द्यावे लागतात परंतु पुढील १ महिन्याकरिता केवळ टॉप अप करत हे कार्ड मिळवता येईल. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्ष पुरणे झाल्याने आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असल्याने त्यासंबंधी निमित्त साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्लेखनीय आहे कि मेट्रो प्रवाश्यानी महा कार्डची मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी केले असून या वतीने मेट्रो प्रवास दरम्यान तिकिटावर १० टक्के सूट दिल्या जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे.
प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू आहे. या प्रणालीच्या माध्यमाने प्रवाशांना गाडीत चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर फक्त त्यांचे कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महत्वाचे म्हणजे कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाश्यांना तिकीट दरावर १० % सुट देखील मिळते. महा कार्ड मेट्रो स्थानकांवर खरेदी करता येते.
महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केल्या जाते. ईएमव्ही मानक आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (AFC) हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.
महा कार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
•मेट्रो स्थानकांवर महा कार्डची खरेदी तसेच टॉप करते येते.
•अत्यंत सुरक्षित चिप आधारित ड्युअल इंटरफेस (संपर्क आणि संपर्करहित) स्मार्ट कार्ड.
•स्वाईप करण्याच्या पद्धतीचा अवलंब
•इंटरनेट आणि मोबाइल आधारित व्यवहारांसाठी सुसंगत
• (Europay, Master, Visa, Rupay) प्लॅटफॉर्मवर स्वीकृत वैयक्तिक कार्ड.
महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे. आता या सोबत महा कार्ड मोफत मिळणार असल्याने या सोयीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा हे आवाहन नागपूरमेट्रोने केले आहे.