नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.दिल्लीतील कार्यालयात फोन करुन ही धमकी देण्यात आली असून यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला.
माहितीनुसार, सोमवारी नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता, त्यानंतर मंगळवारी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गडकरी यांना याअगोदरही धमकीचे फोन आले. नागपूरमधील कार्यालयात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
जानेवारी महिन्यात त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात फोन आले होते. तेव्हा नागपूर पोलिसांनी सांगितले होते की, कर्नाटकातील बेळगाव येथील तुरुंगातून हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणारा जयेश कांथा हा कुख्यात गुंड आणि खुनाचा आरोपी असून तो बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत आहे.