नागपूर : भाजपा वैद्यकीय योग निसर्गोपचार आघाडी नागपूर महानगर द्वारे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात राममंदिर रामनगर येथे आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन योग निसर्गोपचार आघाडी पच्छिम मंडळ अध्यक्षा डॉ श्रद्धा प्रशांत यांनी केले.
हे आरोग्य शिबिर भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रविणजी दटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिरात वैद्यकीय आघाडीच्या संजय लहाने द्वारे नेत्र तपासणी, डॉ डांटुलवर यांनी दंत तपासणी, डॉ सुशांत मुळे यांनी मेडिसिन न्यूरोलॉजी( मधुमेह, स्त्रीरोग, पोटाचे , श्वसनाचे विकार) आदीवर उपचार केले. तसेच यावेळी नागरिकांच्या मोफत बीपी, ब्लड शुगर, पैथोलॉजी टेस्ट करण्यात आल्या. या शिबिरात 223 रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे नियोजन वैद्यकीय आघाडी अध्यक्ष महानगर डॉ गिरीश चर्डे,महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, राकेश कोणतमवार, योग निसर्गोपचार आघाडी अध्यक्षा डॉ माधुरी इंदुरकर, महामंत्री डॉ मुकुंद कुलकर्णी ,संपर्क मंत्री डाॅ अर्पिता चन्ने यांनी केले.
तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका परिणीता फुके,पश्चिम मंडळ अध्यक्ष विनोदजी कान्हेरे,पच्छिम नागपूर नागरिक मंडळाचे अध्यक्ष रवीजी वाघमारे, भाजप शहर महामंत्री संजयजी बंगाले, विशाखा ताई जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी योग शिक्षिका वर्षा अग्रवाल यांच्यासह आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.