नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हांच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भासाठी 22 ते 25 मे दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केले आहे. यानुसार विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामानातील बदलामुळे उन्हाळ्याच्या उर्वरित दिवसांमध्ये पुन्हा एकदा कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. शनिवारी नागपुरात ४३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे आतापर्यंतच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांक होते. 44.4 अंश सेल्सिअससह अकोला हे विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरले, त्यानंतर वर्धा 44 अंश सेल्सिअसवर होते.
अमरावती (42.6 अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (42.2 अंश सेल्सिअस), चंद्रपूर (43.4 अंश सेल्सिअस), गोंदिया (42.6 अंश सेल्सिअस), वाशिम (42.2 अंश सेल्सिअस) येथे शनिवारी 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात 18 जून रोजी मान्सून दाखल होऊ शकतो.