Published On : Tue, May 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एक महिन्याच्या बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासची शिक्षा

नागपूर : आपल्या मेहुणीच्या एक महिन्याच्या बाळाचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. अली यांनी आजन्म सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे. गणेश गोविंदराव बोरकर (४०, रा. वडोदा ता. कुही ), असे आरोपीचे नाव असून त्याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे.

माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी रूपाली यांच्या मोठ्या बहिणीचा पती आहे. रूपाली या आपल्या माहेरी बाळंतपणाकरिता आल्या होत्या. रूपाली यांची मोठी बहीण प्रतीभा यांचा आरोपी पती हा घरी आला व त्यांच्या सासरच्या लोकांना त्याची पत्नी प्रतिभा हिला सासरी कुही येथे का पाठवत नाही, यावरून त्याने वाद सुरु केला. यादरम्यान रूपाली एका महिन्याच्या बाळाला घेऊन आरोपीस समजाविण्यासाठी गेली होती. यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की त्यावेळी आरोपीने त्यांच्या लहान बाळाचा चाकू भोसकून खून केला.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणाचा तपास पारशिवणीचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा सादर झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. अली यांनी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ मध्ये आजीवन कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी वकील पंकज तपासे यांनी आपली बाजू मांडली.

Advertisement