Advertisement
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २५ किंवा २६ मे रोजी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) आयसीएसई आणि आयएससीच्या निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकालाची प्रतीक्षा होती. मात्र आता प्रतीक्षा संपणार असून २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळातर्फे यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.