नागपूर : शहरातील नागरिकांना आजपासून म्हणजेच बुधवार ते शनिवारी चार दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे महत्त्व समजून घेण्यासाठी रामण विज्ञान केंद्राने शहरात तर विदर्भातील सर्व शहरे, ग्रामीण भागात निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन स्काय वॉच ग्रुपने केले आहे.
नागपूर जिल्ह्यात २४ मे रोजी भिवापूर येथे दुपारी १२ वाजून ८ मिनिटे तर उमरेड येथे येथे दुपारी १२ वाजून ९ मिनिटे यावेळी शून्य सावली अनुभवता येईल. तसेच २५ मे रोजी कुही येथे येथे दुपारी १२ वाजून ९ मिनिटे, हिंगणा येथे येथे दुपारी १२ वाजून १२ मिनिटे आणि बुटीबोरी येथे दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी सावली हरवेल. याखेरीज २६ मे रोजी नागपूर शहर आणि कामठी येथे १२ वाजून १० मिनिटांनी तर कळमेश्वर येथे दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येईल.
तर २७ मे रोजी मौदा येथे येथे दुपारी १२ वाजून ९ मिनिटे, रामटेक येथे दुपारी १२ वाजून १० मिनिटे, काटोल येथे येथे दुपारी १२ वाजून १३ मिनिटे, पारशिवनी येथे येथे दुपारी १२ वाजून १० मिनिटे व सावनेर येथे येथे दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नागरिकांना शून्य सावली दिवस अनुभवता येईल.