Advertisement
नागपूर : शहरात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे ८ वे आंतराष्ट्रीय अधिवेशन २९ मे ते ४ जून पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या समारंभामध्ये उल्हास कशाळकर, प्रभा अत्रे ,परवीन सुल्तान यांच्यासह १०० हुन अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. नागपुरातील व्हीएनआयटीमध्ये या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) ही नागपूर स्थित तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. मूळरित्या ही संस्था सन १९६० मध्ये स्थापन झाली नंतर या संस्थेस मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांचे सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे नाव देण्यात आले.