Published On : Thu, Jun 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यानंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
दहावीच्या विद्यार्थ्यांना १. www.mahresult.nic.in २. http://sscresult.mkcl.org ३. https://ssc.mahresults.org.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली.
दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची घेण्यात आली होती.
Advertisement

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above