नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या निकालाची एकूण टक्केवारी 93.86 टक्के असून पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण उत्तीर्ण परीक्षार्थींची संख्या 60 टक्क्यांहून जास्त आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनेच बाजी मारली असून सर्वाधिक टक्केवारीत कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याची माहिती बोर्डाने दिली.
राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
या ठिकाणी पहा निकाल –
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
ssc.mahresults.org.in