Published On : Fri, Jun 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

… तर गोडसेंची औलाद कोण ? देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा औवेसींकडून समाचार

मुंबई : कोल्हापूरमध्ये काही समाजकंटक तरूणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतान याचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण झाला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून आल्या? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. फडणवीस यांच्या टीकेला एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की औरंग्याच्या औलादी, तुम्हाला सगळं माहिती आहे ? मला माहिती नाही तुम्हाला किती माहिती आहे? पण मग गोडसेची औलाद कोण आहे? आपटेंची ओलाद कोण आहे? याचेही उत्तर द्या, असा घणाघात औवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेवगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड येथे हिंदू – मुस्लीम समाजामध्ये मोठा वाद पेटला होता. औरंगजेबाचे फोटो किंवा आक्षेपार्ह फोटो स्टेटसला ठेवण्यावरून वाद निर्माण झाला. या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे टीकास्त्र सोडले होते.

Advertisement