नागपूर : लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत आर्म्स अॅक्ट अन्वये दोन जणांवर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 3 पोलीस पथकाने कारवाई केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तो १७ वर्षाचा आहेत तर ब्रिजेश कुमार सेवकराम (वय ४५ रा. पाचपाणी खापा जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपींकडून २० हजार किंमतीचा एक देशी बनावटीच्या कट्ट्यासह एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर कलम 3,25 भा. ह. का. सह कलम 135 म पो का. अन्वये ही कारवाईत करण्यात आली असून लकडगंज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.