नागपूर : अनेकांना रेल्वेने प्रवास करायला आवडतो.मात्र रेल्वेसंदर्भातील काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टीसंदर्भात आपण अभिज्ञ असतो. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेऊया की भारतातल्या सर्वात लहान रेल्वे मार्गासंदर्भात.
देशातील सर्वात लहान रेल्वे मार्ग नागपुरात असून फक्त १० मिनिटात हा आपला प्रवास संपवितो. ते म्हणजे नागपूर ते अजनी रेल्वे मार्ग आहे. विशेष म्हणजे हा मार्ग अवघ्या ३ किमीचा आहे.
भारतीय रेल्वे या प्रवासासाठी जनरल क्लासपासून ते स्लीपर क्लास, थर्ड एसी आणि सेकंड एसीचे भाडे आकारते. एकंदरीत ८०० रुपयेपर्यंतचे भाडे प्रवाशांकडून आकारण्यात येते. नागपुरात राहणारे रहिवासी या मार्गावरून दररोज प्रवास करतात.
दरम्यान एकीकडे प्रवाशांना लांबच्या प्रवासासाठी रेल्वेने प्रवास करणे आरामदायक वाटते. मात्र नागपूर ते अजनी रेल्वेचा प्रवास फक्त 3 किलोमीटरचा आहे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.कारण ट्रेनला वेग पकडण्यासाठीच एवढा वेळ लागतो.