नागपूर: नागपूर मेट्रोच्या फ्रिडम पार्क येथे जागतिक विटीलिगो दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागपूर मेट्रो असलेल्या झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन येथे येथे जनजागृती करीता पथ नाट्य, गीत सादर आले. विदर्भ डर्मेटोलॉजिकल सोसायटी आणि महा मेट्रो नागपूरच्या संयुक्त उद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सोसायटी पदाधिकारी, नागपूर मेट्रोचे अधिकारी आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झालेत.
दरवर्षी २५ जून हा दिवस विटिलिगो दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. विटिलिगो किंवा ल्युकोडर्मा बद्दल जनजागृती करणे आणि त्याबद्दलचे ज्ञान अद्ययावत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विटिलिगो सामाजिक कलंक मानल्या जाते. या स्थितीबद्दल सामान्य लोकांमध्येही अनेक समज आणि गैरसमज आहेतआणि ते दूर करण्याकरता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री अनिल कोकाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणात श्री कोकाटे यांनी विदर्भ डर्मेटोलॉजिकल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे या अनोख्या कार्यक्रमाच्या आयोजन करता अभिनंदन केले. या सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने समाजात विटिलिगो किंवा ल्युकोडर्मासंबंधी असलेले गैरसमज दूर होतील असा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
या अंतर्गत एक पथ नाट्य सादर करण्यात आले. डॉ.अतुल सालोडकर, डॉ.प्रियांका मगिया, डॉ.अंशुल जैन, डॉ.पूजा बालपांडे, डॉ.नितीन बर्डे, डॉ.सौरभ जयस्वाल, डॉ.सुमित जग्यासी, डॉ.ईशा अग्रवाल, डॉ.जेरील बनाईत यांनी या नाटकात विविध भूमिका मांडल्या. डॉ.आशिष पिंपळे यांनी पथ नाट्याचे दिग्दर्शन कौतुक केले. डॉ.मनोज वाघमारे यांनी त्वचारोगावर स्वत: तयार केलेले गीत सादर केले. प्रश्नोत्तराच्या सत्रात त्वचारोग डॉ विक्रांत सावजी व डॉ बिपीन मेहता यांनी जनतेचे प्रश्नांना उत्तरे दिली आणि विटीलिगो बाबतचे सर्व गैरसमज मोडीत काढले.
विटिलिगो (पांढरे डाग) ही सामान्य लोकसंख्येच्या एक टक्के लोकांमध्ये आढळणारी एक सामान्य स्थिती आहे. त्वचेवर पांढरे ठिपके अथवा चट्टे दिसतात जे व्यक्तीला कोणतीही शारीरिक समस्या देत नाहीत परंतु कॉस्मेटिक विकृती आणि सामाजिक समस्यांमुळे खूप मानसिक ताण येऊ शकतो. हे कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते. हे त्वचेतील मेलेनोसाइट्स नावाच्या पेशी द्वारे मेलेनिन रंगद्रव्य (त्वचेचा रंग) तयार करण्याच्या असमर्थतेमुळे होते.
नेमके कारण माहित नाही परंतु अज्ञात कारण आहे ज्यामुळे त्वचेतील रंग निर्माण करणार्या पेशी नष्ट करण्यासाठी स्वयंप्रतिकार / ऑटो इम्यून यंत्रणा सक्रिय होते. त्वचारोग स्पर्शाने पसरत नाही. त्वचारोग हा कुष्ठरोगापेक्षा वेगळा आहे जिथे तुम्हाला त्वचेची संवेदना कमी होऊन हलके किंवा लाल ठिपके दिसतात. कुष्ठरोग हा जीवाणूंमुळे होतो आणि योग्य उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होतो. या सर्व बाबींवर प्रकाश टाकणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.