Published On : Thu, Jun 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर शिंदे गटाच्या नेत्याने दिले ‘हे’ प्रत्युत्तर !

Advertisement

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप -शिंदे गटाच्या युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, यावर भाष्य केले. यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या. देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत बोलताना पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे नमूद केले. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे हेच निवडणुकीनंतर युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी कोणतीही भूमिका न घेता पक्षातील वरिष्ठांकडे बोट दाखवले.

कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाही, असे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून एकनाथ शिंदेंच्या नावावर अद्याप पुढील मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली.

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री कोण असेल हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे. याआधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय की आम्ही युती म्हणून एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ. निवडणूक झाल्यानंतर काही बदल होणार असतील तर त्या बदलांसाठी शिंदे गट तयार आहे. असेही असू शकतं की काही तडजोड असेल. काही काळ तुम्ही राहा, काही काळ आम्ही राहू वगैरे. आमची त्याबद्दलची भूमिका लवचिक आहे, असे म्हणत केसरकर यांनी फडणवीसांच्या विधानावर भाष्य केले.

Advertisement