नागपूर : जनतेने “द बेस्ट प्रेसिडेंट” म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांना पसंती दिली आहे. न्यूज एरेना इंडिया पोलच्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. तब्बल २३१४० मते मिळवत महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनाही लोकप्रियतेत मागे टाकले.अण्णामलाई २१०८३ मते मिळवतदुसऱ्या स्थानी राहिले. बावनकुळे आणि अण्णामलाई यांच्यात सर्व्हेदरम्यान स्पर्धा पाहायला मिळाली. दोन ते चार टक्के सतत मागे-पुढे असे मागच्या २४ तासात दोघांमध्ये चाललेल्या “काटे की टक्कर”ला अखेर पूर्णविराम मिळाला.
तेव्हा तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना एकूण मतांच्या ४१ टक्के तर महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांना ४५ टक्के मते मिळाली.
चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असं सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे. २६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आले.
“न सोऊंगा न सोने दुगा” या कार्यपद्धतीमुळे बावनकुळे प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांची “सर्वोत्तम प्रदेशाध्यक्ष” म्हणून न्यूज एरेना इंडियाकडून झालेल्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे.