Advertisement
नागपूर : , महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचे आगमन झाले.आता हवामान खात्यानुसार विदर्भात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आले आहे.
नागपुरात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरीं अधून-मधून बरसत आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर मध्य महाराष्ट्रातही ‘यलो अलर्ट’ असून, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.