Published On : Mon, Jul 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक ; उद्धव ठाकरेंचे टिकास्त्र

Advertisement

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुरात शिवसैनिकांना संबोधित केले. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी फडणविस यांची एक क्लिप ऐकवत त्यांच्यावर सडकून टीका केली.फडणवीस नागपूरला लागलेले कलंक आहेत,अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

या ऑडिओ क्लिपमध्ये फडणवीस म्हणतात की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही.धर्म नाही, शाश्वत नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहू. एकवेळी अविवाहीत राहणं पसंत करेल. पण, राष्ट्रवादीशी युती करणार नाही,असे फडणवीस म्हणताना दिसत आहेत.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Advertisement
Advertisement