Advertisement
नागपूर : शहरात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा राहणार असून बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती आहे.
हवामान खात्याकडून विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही भागांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात सध्या तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपर्यंत कोकणात चांगला, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.