मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली. यापार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र भाजपची बैठक बोलावण्यात आली, यामध्ये आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.
भाजपच्या या बैठकीत काही पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, पहिले पोस्टर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे होते, यामध्ये भाजपने १५२ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्या प्रशिक्षण वर्गात प्रत्येक बुथवर प्रत्येकजण महत्वाचा घटक आहे. प्रत्येक समाजापर्यंत आम्ही जाणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारची विकासकामे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात महायुतीच्या २२० जागा निवडून येतील. महाविजय २०२४ चा आम्ही संकल्प केला असल्याचे बावनकुळे म्हणाले.