Published On : Sat, Jul 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या पुरवठा निरीक्षकासह दोघांना शेतकऱ्याकडून लाच घेताना अटक ; एसीबीची कारवाई

Advertisement

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत नागपूरच्या पुरवठा निरीक्षकासह दोघांना शेतकऱ्याकडून लाच घेताना अटक केली आहे. शेतजमीन एनए असल्याच्या आदेशाची प्रत देण्यासाठी ही लाच घेण्यात आली.

पुरवठा निरीक्षक आतिष सुभाष जाधव (३१, रा. नागपूर) व महसूल साहाय्यक तसेच कनिष्ठ लिपिक अनिल मधुकर उंदिरवाडे (४१, रा. रामटेक) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.५५वर्षीय शेतकऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामटेक तालुक्यातील खुमारी येथील शेतकऱ्याकडे तीन एकर शेती आहे. त्याने ही शेती अकृषक करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर केला. तहसीलदारांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत शेतजमीन एनए केली.

मात्र, दोघांनी शेतकऱ्याला याबाबत न सांगता आदेश काढून त्याची प्रत देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. २५ हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे ठरले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली. अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण लाकडे, हेडकॉन्स्टेबल विकास सायरे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, करुणा सहारे, राजू जांभूळकर यांनी गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर तिघांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर
अनिलसह दोघांविरुद्ध रामटेक पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement