नागपूर: मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीतर संबंधित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचे पडसाद नागपुरातही पाहायला मिळाले. आज नागरिकांनी संविधान चौकात या घटनेच्या निषधार्थ कँडल मार्च काढला.
पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी शेकडो लोक आरबीआय चौकात जमल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान ४ मे रोजी या दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्यात आली होती .मणिपूर पोलिसांनी याप्रकरणी १९ वर्षे वयाच्या पाचव्या आरोपीला शनिवारी अटक केली. या अमानुष घटनेची चित्रफित बुधवारी उघडकीस आली होती. यापूर्वी अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.