Published On : Fri, Jul 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आयएएस अधिकारी श्रवण हर्डीकर यांची नागपूर महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती !

Advertisement

नागपूर:आयएएस अधिकारी श्रवण हर्डीकर यांची मुंबईहून नागपूरला बदली करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी मुंबईत अतिरिक्त आयुक्त (शहर) म्हणून पदभार स्वीकारला होता. आता त्यांच्यावर नागपूर महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हर्डीकर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयातून बी. इ. इन्स्ट्रमेंटेमेशन ही पदवी त्यांनी संपादित केली. सन २००४ मध्ये त्यांची भारतीय राजस्व सेवेत निवड झाली. त्यानंतर सन २००५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत ते संपूर्ण भारतातून सातव्या क्रमांकाने तर महाराष्ट्रातून प्रथम आले आहेत.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement