शहापूर: समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.ठाणे जिल्ह्यात शहापूर इथे मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात १६ कामगारांचा मृत्यू झल्याची महिती समोर येत आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले असून ढीगाऱ्याखाली अजून कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जोरात सुरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडली.शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला आणि हा भीषण अपघात घडला.