नागपूर : आज आकाशात ‘सुपरमून’ दिसणार आहे. १ ऑगस्टच्या मध्यरात्री व २ ऑगस्टला पहाटे आकाशात चंद्राला अधिक मोठ्या प्रमाणात व चमकदार अशा स्थितीत पाहता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५७ हजार कि.मी. अंतरावर असल्याने चंद्रबिंब आकाराने मोठे व अधिक प्रकाशित दिसेल. एकंदरीत चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. पृथ्वीच्या जवळ येणारा चंद्र सुपरमून म्हणून ओळखला जातो. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्या कारणाने हा ‘सुपरमून’ पाहायला मिळत असल्याचे प्रभाकर दोड म्हणाले.