मौदा: स्थानिक श्रीमती राजकमल बाबूराव तिड़के महाविद्यालया तील नेचर हैप्पी क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारे प्राचार्य डॉ देबाषिश भौमिक यांच्या अध्यक्षतेखा ली वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. प्रमुख अतिथि श्री तुकाराम लुटे,पत्रकार पुण्यनगरी आणि कोषाध्यक्ष, तालुका पत्रकार संघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन् अभियानाची सुरुवात झाली.
या प्रसंगी प्राचार्यानी हिरवी वसुंधरा यावर प्रकाश टाकून वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. प्रमुख अतिथि श्री लुटे यांनी विद्यार्थ्याना आपल्या परिसरात वृक्ष लावण्याचे आव्हान केले. त्याचप्रमाने वाढदिवस असलेल्या विद्यार्थिनी ना रोप देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वृक्ष रैली चे आयोजन करण्यात आले. सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यानी पावसाची पर्वा न करता वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाचे आयोजन व संचालन डॉ. हरिश मोहिते यांनी केले. या प्रसंगी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत डफर, डॉ. ईश्वर वाघ, डॉ. सुनील बोरकर , डॉ. गोपाल् झाड़े, डॉ.व्यंकटेश पोटफोड़े, डॉ. नरेन्द्र गाड़गे, डॉ. संध्या वानखेड़े, डॉ. दिलीप चव्हाण, प्रा. सूर्यभान आमिल्दुके, प्रा. संजय गायकवाड, प्रा. सुवर्णा बोरकर, डॉ. मंगला गजभिये, प्रा. सन्दिप् शहाणे,प्रा. यशवंत शहाणे, प्रा.सुजीता बालपांडे, प्रा.दीपाली तड़स, प्रा. मनीषा इखारे, श्रीमती संध्या साबले, श्री प्रवेश वासनिक आदि सोबतच विद्यार्थी विद्यार्थिनिनी अभियानात् सहभाग घेऊन यशस्वितेकरिता सहकार्य केले.