नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावर दोन वकिलांमध्ये झालेल्या वादामुळे चांगलाच गोंधळ उडाला. या दोन्ही दोन वकिलांमधील खुर्चीवरून वाद पेटला. हा वाद इतका चिघळला की, कनिष्ठ वकिलाने ज्येष्ठ वकिलाच्या डोक्यात खुर्चीने हल्ला केला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अधिवक्ता वसंत उमरे त्यांच्या नियुक्त चेंबरमध्ये आले. तिथे आधीच एक कनिष्ठ वकील बसलेला दिसला. हे पाहून अधिवक्ता उमरे भडकले आणि त्यांनी तातडीने कनिष्ठ वकिलाला खुर्ची खाली करण्याचे आदेश दिले. यावर कनिष्ठ वकिलाने नाराजी व्यक्त केली.यानंतर दोन्ही वकिलांमध्ये बाचाबाची झाली.
कोणतीही पूर्वसूचना न देता कनिष्ठ वकिलांनी खुर्ची उचलून वरिष्ठ वकिलाच्या डोक्यावर प्रहार केला. यामुळे ज्येष्ठ वकिलाच्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर सहकारी वकिलांनी जखमी ज्येष्ठ वकिलावर तातडीने वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली. हल्ल्यातील आरोपी असलेल्या कनिष्ठ वकिलाचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.