Advertisement
नागपूर : एअर अरेबिया विमानाने शारजाहवरून नागपूरला आलेल्या एका प्रवाशाकडून ३४० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने नागपूर विमानतळावर खळबळ उडाली.
माहितीनुसार,एअर अरेबिया विमानाने समशान अहमद हा प्रवासी नागपूरला आला होता. सीमाशुल्क विभागाला मिळालेल्या मुक्त माहितीच्या आधारे विमातळावर सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. समशान अहमद याची अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरु असताना गुप्त ठिकाणाहून एक पॅकेट जप्त करण्यात आले.
लिक्विड फार्ममध्ये तो ३४० ग्रॅम सोने असल्याचे उघडकीस आले. याच सोन्याचे बाजारभाव २० लाख रुपये असून सीमाशुल्क विभागाकडून समशान अहमदला अटक करण्यात आली आहे. विभागाकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.