नागपूर : राम नगर चौकात रविवारी दुपारी दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वकिलाला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. भरधाव वेगात एसयूव्ही चालवणाऱ्या वकिलाने दुचाकीला धडक दिली आणि एका महिला पादचाऱ्याचा चिरडून मृत्यू झाला.
मयंक मकरंद अग्निहोत्री (२७, रा. शंकर नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निहोत्री यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३३८ आणि ३०४ (अ) नुसार मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पावस राजेंद्रकुमार चौरसिया (३३) , कुसुम ईश्वर भोयर (६४,संजय गांधी नगर, पांढराबोडी) असे मृतांचे नावे आहेत. अग्निहोत्री आपल्या कुटुंबियांसह राम नगर चौकातील मंदिरात आले होते. अपघातानंतर एसयूव्ही रस्त्यावर पलटी झाली आणि या अपघातात अग्निहोत्रीही जखमी झाल्याची माहिती आहे.