Advertisement
नागपूर : शहारत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. चोरटयांनी ज्वेलर्सच्या घरातून १.११ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ ऑगस्टला रात्री १०.३० ते १८ ऑगस्टला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली.
माहितीनुसार, राकेश गंगाप्रसाद गुप्ता (वय ५१, रा. सरस्वती मुलींच्या शाळेजवळ) हे आपले घर बंद करून बाहेर गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ६० हजार असा एकुण एक लाख ११ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश दुबाले यांनी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.