नागपूर : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. सना खान दोन ऑगस्टला जबलपूरला गेल्यावर तीन ऑगस्टला अमित ऊर्फ पप्पू शाहू याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती मृतदेह आढळला नाही.
दुसरीकडे मानकापूर पोलिसांनी या प्रकरणात जबलपूर येथील आमदार संजय शर्मा यांना २३ ऑगस्टला पोलिसांनी हजर होण्याची नोटीस पाठविली होती.मात्र आमदार शर्मा आज चौकशीसाठी नागपुरात दाखल झाले आहे. संजय शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. सीताबर्डी येथील झोन 2 डीसीपी कार्यालयात हजर होण्यापूर्वी, शर्माने सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये माध्यमांशी संवाद साधला. सना खानच्या हत्येतील आपली भूमिका आणि मुख्य आरोपी अमित शाहू याच्याशी आपले काहीच घेणेदेणे नसल्याचे शार्म यांनी स्पष्ट केले.
सना खान हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे बाहेर पडत आहेत.या हत्या प्रकरणात महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रमुख राजकीय नेत्यांचा संबध असल्याचे सांगण्यात येत आहे. सना खान हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अमित, कमलेश, अमितचा मित्र राजेश सिंग, नोकर जितेंद्र गौड व धमेंद्र यादव या पाच जणांना अटक केली. माहितीनुसार २ ऑगस्टला सकाळी सना यांची हत्या केल्यानंतर अमितने सनाच्या पर्समधून काढलेले तीन मोबाइल विश्वासू असलेल्या धमेंद्रला दिले. धमेंद्रने तिन्ही मोबाइलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खास असलेल्या कमलेशकडे सोपविली होती.
धर्मेंद्रच्या अटकेनंतर पोलिसांनी मोबाइलबाबत विचारणा केली असता कमलेशचे नाव समोर आले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली.जबलपूरमधील मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ एक मोबाइल लपविला असून अन्य दोन मोबाइल नर्मदा नदीतील धरणात फेकल्याची माहिती कमलेशने पोलिसांना दिली. मात्र कमलेशने ते दोन मोबाईल धरणात फेकले नसून इतर ठिकाणी लपविल्याचे पोलिसांना शंका आहे.