नागपूर : माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्याद्वारे प्राप्त ३१ लक्ष रुपये निधीतून निर्मित हंसापुरी खदान प्राथमिक शाळेजवळ श्री उदय मित्र हनुमान मंदिर समाज भवनचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, माजी नगरसेविका सौ. विद्या कन्हेरे, सौ. सरला नायक, भाजपा मध्य नागपूरचे अध्यक्ष श्री किशोर पलांदुरकर, श्री उदय मित्र हनुमान मंदिरचे अध्यक्ष नानाभाऊ खोब्रागडे उपस्थित होते.
हंसापुरी खदान शाळेजवळ उदय मित्र हनुमान मंदिर ही पुरातन वास्तू होती. ही वास्तू पूर्णत: जीर्ण असल्याने संस्थेच्या पदाधिका-यांद्वारे तत्कालीन महापौर श्री दयाशंकर तिवारी यांना निवेदन देउन वास्तूची पुननिर्मिती करण्याची मागणी करण्यात आली होती.
महापौर पदाच्या कार्यकाळात श्री दयाशंकर तिवारी यांनी प्रस्तावित समाज भवन करिता ३१ लक्ष रुपये निधी प्रदान केले. कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर सदर वास्तूच्या निर्मितीचे भूमिपूजन करण्यात आले. जुनी वास्तू पाडून त्याच जागेवर १८०० फूट तळमजला आणि १८०० फूट पहिल्या माळ्याचे बांधकाम पूर्ण झाले.
परिसरातील नागरिकांसाठी कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राष्ट्रीय कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता ही वास्तू मोठी सुविधा ठरणार आहे. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या मागणीवर सदर वास्तूमध्ये अभ्यासिका निर्माण करण्यासाठी आपल्या खासदार निधीमधून निधी देण्याची घोषणा केली. सोबतच हंसापुरी खदान प्राथमिक शाळेच्या परिसरामध्ये क्रीडा विकासासाठी ५० लक्ष रुपये निधी तसेच परिसरातील मनपा इंग्रजी शाळेची नवीन वास्तू निर्मितीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी खासदार निधीमधून देण्याची घोषणा देखील ना. श्री. गडकरी यांनी केली.
कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव श्री अशोक नायक यांनी केले. आभार श्री रवी गाडगे पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री नरेंद्र ढोबळे, विवेक राजूरकर, दयाराम मोटघरे, नरेंद्र गौर, दिनेश गौर, मधु गौर, मेघश्याम मानकर, सुभाष दानव, चंदू घारपेंडे, डॉ. अनंत रेवतकर, विनय नायक आदींनी परिश्रम घेतले.