Advertisement
नागपूर: देशातील रेडिओ सृष्टीने आपला प्रसिद्ध आवाज गमावला .आरजे राजन, यांचे ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी नागपूर येथे निधन झाले.
आरजे राजन यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी न्यूरॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आरजे राजन यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण रेडिओ सृष्टीत शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांना सात्वन करण्यात येत आहे. नागपूर टूडे कडून आरजे राजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.