नागपूर : यशोधरा नगर पोलिसांना गस्तीदरम्यान शस्त्रधारी आरोपी दरोड्याचा कट रचत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी एकूण 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती आहे. तर इतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.