कामठी :स्थानिक कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कांद्री येथे डब्लूसीएल खाणीच्या ब्लास्टिंग च्या धक्क्याने कांद्री येथील वॉर्ड क्र 1 येथे झोपडी कोसळल्याने झोपडीत झोपलेल्या बापलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना आज दुपारी 12 .45 वाजता घडली.कमलेश गजानन पोटेकर ( वय ३४) असे मृत वडिलाचे नाव असूनयाजवी कमलेश पोटेकर ( वय ५)असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक कमलेश पोटेकर हा नावी म्हणून कार्यरत असून आज सोमवार सुटीचा दिवस असल्याने घरी विश्रांती घेत होता. तर तर पाच वर्षोय बालिका सुद्धा विश्रांती घेत होती तर इतर घरमंडळी घराबाहेर होते.दरम्यान आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान अचानक झालेल्या खाणीच्या ब्लास्टिंगमुळे झोपडीला मोठा धक्का बसला. यादरम्यान झोपडीत झोपी असलेल्या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्यांनतर दोन्ही मृतदेहाच्या पार्थिवावर कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.