नागपूर : नागपूर ते मुंबई दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईला निघालेल्या रेल्वेगाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना १४ वर्षीय मुलगी रेल्वेगाडी आणि फलाटाच्या फटीत पडली. सुदैवाने तेथे तैनात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने धावत जाऊन तिला ओढले आणि तिचे प्राण वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक ८ वर घडली.
नागपूर ते मुंबई दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईला निघालेल्या सोनाली गिरी या नागपूर स्टेशनवर पोहोचल्या. त्या दुरान्तो एक्सप्रेसमध्ये चढल्या. यादरम्यान त्यांना सोडण्यासाठी पल्लवी गिरी आणि तिची मुलगी निधी गिरी देखील आल्या होत्या. या दोघीही सोनाली यांचे सामना सीटपर्यंत पोहोचविण्यासाठी डब्यात चढल्या. लगेच गाडी सुरू झाली.
गाडी सुटल्याचे लक्षात येताच निधीने धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. तिचा पाय घसरला आणि ती गाडी आणि फलाटच्या फटीत ती पडली. येथे तैनात आरपीएफ जवान जवाहर सिंह यांनी आपली तत्परता दाखवत कोणतीही पर्वा न करता निधी गिरीचे प्राण वाचवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.