नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच असून ट्रकच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जिल्हा वर्धा येथे ट्रक (क्रमांक MH 44 U 2807) हा नाशिकहून नागपूरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित होऊन ट्रक मेडीन मधील पुलाला धडकल्याने मोठा अपघात घडला.
सय्यद अख्तर (वय 30, रा.केज जिल्हा बीड) असे मृत चालकाचे नाव आहे. ट्रकचा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चेदमेंदा झाला.तसेच ट्रक चालक ट्रकच्या समोरच्या भागात फसून जागीच ठार झाला.
मृत चालकाला हायवे ॲम्बुलन्स च्या मदतीने ग्रामीण रुग्णालय सेलू जिल्हा वर्धा येथे पाठविण्यात आले . तसेच अपघात ग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आला. म.पो.केंद्र खुर्सापार येथील अधिकारी उपनिरीक्षक भीमराव वाघाळे ,पोलीस हवालदार अमोल सोमकुवर,लक्ष्मण बंनने, प्रवीण चव्हाण यांनी वेळीच घटनास्थळ पोहोचवून वाहतूक सुरळीत केली.