Published On : Fri, Sep 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

बँक फसवणुकीप्रकरणी स्टील्स ॲण्ड पॉवर कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक

मुंबई, पुणे, नवी दिल्ली, नागपूर आणि दुर्ग येथील १२ ठिकाणी छापेमारी
Advertisement

मुंबई : मेसर्स टॉपवर्थ स्टील्स ॲण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अभय नरेंद्र लोढा यांना बँकेच्या फसवणुकीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी ) अटक केली आहे. आयडीबीआय बँकेचे ६३ कोटी रुपयांचे कर्ज फसवणुकीप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. लोढा यांना विशेष न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी ईडीने मुंबई, पुण्यासह देशभरात १२ ठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबई शाखेनने मेसर्स टॉपवर्थ स्टील्स आणि पॉवर प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराबाबत तपासाला सुरूवात केली होती. त्याप्रकरणी अभय नरेंद्र लोढा आणि इतर संशयीतांशी संबधित मुंबई, पुणे, नवी दिल्ली, नागपूर आणि दुर्ग येथील १२ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत लेटर ऑफ क्रेडिट/ट्रेड क्रेडिट बँक गॅरंटी या कर्ज सुविधेचा वापर करून आरोपींनी फसणूक केल्यामुळे आयडीबीआय बँकेचे ६३ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. अभय नरेंद्र लोढा यांच्या नियंत्रणाखालील टॉपवर्थ ग्रुप ऑफ कंपन्यांनी टॉपवर्थ ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांद्वारे तीन हजार कोटी रुपयांचे संशयीत व्यवहार केल्याचे ईडीकडून सांगण्यात येत असून याप्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Advertisement