Advertisement
नागपूर : शहरात गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने कुख्यात आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव हिमांशू चंद्राकर असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
पोलीसांनी झडतीदरम्यान आरोपीच्या बॅगेतून धारदार शस्त्र आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.
आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने तांत्रिक मार्गाने तपास करून आरोपीला अटक केली.पुढील तपासासाठी आरोपीला राणा प्रताप नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.