नागपूर : राजधानी दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या जी 20 (G-20) परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण याच जी 20 परिषदेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. 9 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात G20 डिनरचे आयोजन करण्यात आले. या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख कारण्यात आला असून इंडिया नाव हटविण्यात आले आहे, यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्वीटमध्ये जयराम रमेश म्हणाले, संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत जो इंडिया आहे. जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांन केले होते आवाहन – गुवाहाटीमध्ये सरसंघाचे नेते मोहन भागवत यांनी लोकांना ‘इंडिया’ऐवजी भारत बोलण्याचे आवाहन केलं आहे.
आपल्या देशाचं नाव इंडिया नसून भारत आहे, असं भागवत यांनी सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, शतकानुशतके या देशाचे नाव भारत आहे, ‘इंडिया’ नाही. म्हणून आपण देशाचे जुने नाव वापरावे. बोलताना आणि लिहिताना सर्वत्र भारत असा उल्लेख करावा.