मुंबई : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विशेष विधेयक मांडण्याच्या विचारात आहे. अर्थात मराठा आरक्षणासाठी सरकार विधेयक आणणार अशी चर्चा सरकारच्या प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच अध्यादेश आणला तर टिकाणार नाही असेही सरकारचे मत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचे उपोषण चालू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह बुधवारी आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नव्हता. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठक होणार असून यामाध्यमातून राज्य सरकार निर्णय घेणार आहेत.