नागपूर : शहारत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यंदा जन्माष्टमीला गोविंदा होऊन थर रचून जिंकणाऱ्या आणि दहीहंडी फोडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिला गोविंदा पथकांमध्ये युवतींसह घरगुती, नोकरदार महिलांचादेखील सहभाग दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे नागपुरात महिला गोविंदा पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला गोविंदा पथकांमध्ये प्रचंड उत्साह असून गेल्या काही दिवसांपासून दहीहंडी फोडण्याच्या सरावाला सुरुवात झाली आहे. शहरातील जय दुर्गा आणि जयमहाकाली या महिला गोविंदा पथकांची तयारी जोरात दिसून येत आहे. सोनझारीनगर येथील ग्राउंडवर यांचा सराव सुरू होता.