नागपूर : मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२३ मध्ये ६.७१ दशलक्ष टन मालवाहतूक करून ७०३ कोटी रुपयांचा महसूल मिळविला.
मागील वर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीच्या महसुलाची टक्केवारी २५.६५ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत (ऑगस्ट-२०२२) मध्ये ५.५६ दशलक्ष टन लोडिंग करून ५६० कोटी कमविले होते. मध्य रेल्वेने आज ऑगस्ट २०२२ आणि ऑगस्ट २०२३ च्या मालवाहतुकीची तुलनात्मक आकडेवारी जाहिर केली आहे. त्यानुसार ऑगस्ट २०२२ मध्ये कोळशाच्या ५३४ रेकची वाहतूक केली होती. यावर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये कोळशाचे ७२२ रेकची वाहतुक करण्यात आली. ऑगस्ट-२०२२ मध्ये सिमेंट आणि क्लिंकरचे १५५ रेक लोड केले होते. यावर्षी सिमेंट आणि क्लिंकरचे २४७ रेक लोड करण्यात आले आहे.
कामगिरी सुधारल्यामुळेच वाढ लोडिंग बाबतची कामगिरी सुधारण्यात मध्य रेल्वेने यश मिळवले. त्याचमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत लोडिंगचा महसूल वाढल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये कंटेनर ७५४ रेक, पेट्रोलियम उत्पादनांचे २१८ रेक, लोह आणि स्टीलचे १६२ रेक तर लोह खनिजाचे ४२ रेक लोड केले आहेत. डी-ऑईल केकचे १२ आणि फ्लाय ऍशचे ५ रेकची वाहतूक करण्यात आली. ऑगस्ट २०२२ मध्ये ही संख्या शून्य होती.