नागपूर : राज्यात मराठा आरक्षणावरून मोठा वाद पेटला आहे.यावr भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले.
ओबीसींच्या किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, असा दावा त्यांनी केला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती ती सुटणे आवश्यक होते. हे पाहता मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः त्यांचे उपोषण सोडले.
सर्वपक्षीय बैठकीत जी भूमिका महायुती सरकारने मान्य केली होती. त्यानुसारच आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजने चिंता करू नये. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल ४० वर्षे सत्तेत राहून शरद पवारांना आरक्षण देणे जमले नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलूच नये, असा खोचक सल्लाही बावनकुळे यांनी दिला.